अधिकारी रस्त्यावर...

Foto
 शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात केल्या जात असलेल्या उपाययोजना पाहण्यासाठी तसेच कोरोना योद्धयांचे मनोबल वाढविण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर तसेच जिल्हाधिकारी उदय चौधरी आज रस्त्यावर उतरले. आयुक्त केंद्रेकर यांनी पुंडलिक नगर प्रतिबंधित क्षेत्राला तर जिल्हाधिकारी चौधरी यांनी पदमपुरा भागातील कोविड केअर सेंटरला भेट दिली.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे खूप गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्याकरीता सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ उपचार घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. विनाकारण रस्त्यावर कुणीही  फिरु नये, असे आवाहन आयुक्तांनी केले. गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलातील क्वारंटाइन सेंटर, सेठ नंदलाल धूत रुग्णालय आणि चिकलठाणा औदयोगिक क्षेत्रातील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी महानगर पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी,  उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महापालिकेच्या वैदयकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदींसह अन्य आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शहरातील पद्मपुरा येथील Emergency Operation Center, एमआयटी येथील कोविड केअर सेंटर आणि कांचनवाडी येथील छत्रपती  शाहु महाराज संस्थेच्या आयुर्वेदीक कॉलेज येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तिन्ही ठिकाणच्या सोयीसुविधांची पाहणी करुन तेथील रुग्णांशी, डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.  
 पद्मपुरा येथील Emergency Operation Center ला भेट दिली. याठिकाणी ४१ रुग्ण उपचार घेत असून ७० खाटांची क्षमता या सेंटरमध्ये आहे. 
 एमआयटी कॉलेज हॉस्टेल येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, फॅसिलेटी इंचार्ज यांच्यासह येथील विविध मजल्यावरील रुग्णांशीही  जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला. याठिकाणी २२१ रुग्ण उपचार घेत आहेत.  एखाद्या रुग्णाचा ऑक्सिजन कमी झाला असेल आणि त्याला पुढील उपचारासाठी भरती करेपर्यंत रुग्णाला तात्पुरत्या स्वरुपात रिकव्हरी रुममध्ये ऑक्सिजन देऊन स्थिर केल्या जाते.  अशा प्रकारची  स्पेशल रिकव्हरी रुम इतर कोविड केअर सेंटरमध्ये सुरू करण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना निर्देश दिले. इथे उपचार 
 एमआयटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज संस्थेच्या आयुर्वेदीक कॉलेजच्या पंचकर्म विभागाच्या इमारतीध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या कोविड सेंटरला भेट दिली. या सेंटरमध्ये ७१ रुग्णांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.